भाजप आमदारावर जीवघेणा हल्ला

0

गाझियाबाद : भारतीय जनता पार्टीचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. नंदकिशोर गुर्जर हे गाझियाबादमधील लोनी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. रविवारी रात्री मोटारसायकलस्वारांनी गुर्जर यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. यावेळी गुर्जर यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबाराला प्रत्युत्तर देत त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत सुरक्षित पोहचवत त्यांचे प्राण वाचवले.

भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर रविवारी रात्री मवाना येथे झालेल्या आरएसएसच्या बैठकीत सहभागी होऊन परतत होते. त्याचवेळी मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. दोन बाईक्सवर चार हल्लेखोर होते आणि त्यांनी समोरुन गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार होत असल्याचं कळताच मी खाली वाकलो आणि माझे प्राण वाचवले अशी माहिती स्वत: भाजप आमदार गुर्जर यांनी दिली.