पुणे- 2007 मधील धमाल कॉमेडी असलेला नमस्ते लंडन या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक विपुल अमृतलाल शहा दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी बॉलीवूड फिल्म नमस्ते इंग्लड यंदाच्या दसऱ्याला प्रदर्शित होणार आहे. यात मुख्य अभिनेता म्हणून अर्जुन कपूर तर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत परिणीती चोप्रा दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.