नवी दिल्ली- एनडीए सरकारच्या मंत्री पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले रालोसपाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा आज औपचारिकरित्या महाआघाडीत सामील होऊ शकता असे सांगितले जात आहे. यावेळी कॉंग्रेस नेत्यांसहित आरजेडी नेते तेजस्वी यादव देखील हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी होत आहे.
भाजपसोबत जागा वाटपावरून काडीमोड झाल्यानेच त्यांनी एनडीएतू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिहारमध्ये भाजपने नितीश कुमार यांचा पक्षाला बरोबरीची जागा दिल्याने ते नाराज होते.