रेस्तराँना ऑप्टिमाइज करून व्यवस्थापकांचे सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट
पुणे :- अपलोड फुडी या फूड अॅण्ड बेव्हरेजेस उद्योगाला सेवा देणाऱ्या, ‘सास’वर आधारित सोल्यूशन्स पुरवठादाराने रेस्तराँ मालक आणि व्यवस्थापकांना एक सुलभ आणि शक्तिशाली रेस्तराँ व्यवस्थापन उपाययोजना देण्यासाठी आपल्या उत्पादनांचे अनावरण केले आहे. ही कंपनी व्हाइट लेबल्ड सोल्यूशन्स पुरवठादारांसाठी एक वेगळी वर्गवारी तयार करत असून यांना एक खास बी२बी२सी सेवा दिली जाईल ज्यात ऑर्डर व्यवस्थापन, ग्राहकांचे समाधान तपासले जाईल, एचआरचे कार्य ऑटोमेटेड होईल (उपस्थिती, मॉनिटरिंग आणि पेरोल) आणि इन्व्हेंटरी आणि बॅकएंड व्यवस्थापनासाठी सहकार्य होईल. या कंपनीने पुण्यामध्ये आपले काम सुरू केले असून शहरातील २० आघाडीच्या रेस्तराँसमध्ये ते काम करत आहेत.
अद्ययावत एनालिटिक्सच्या वापराद्वारे ते रिसोर्स ऑप्टिमायझेशनद्वारे सहकार्य करेल आणि एफअॅण्डबी आऊटलेट्सना ग्राहकांची संख्या आणि समाधान वाढवण्यास मदत होईल आणि त्यामुळे महसूल वाढीचे फायदे मिळतील. पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील शहरांमध्ये ३००० पेक्षा अधिक रेस्टॉरंट्सपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
अपलोडफुडीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक योगेश घोरपडे म्हणाले की, “आमच्या २० भागीदार रेस्टॉरंट्सच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या पुण्यातील पायलट प्रोजेक्टबद्दल आम्हाला आनंद आहे. संपूर्ण शहरात एफअँडबी उद्योग वेगाने बदलू लागला आहे आणि त्याचे कारण म्हणजे ग्राहकांच्या त्यांच्या आवडत्या रेस्तराँमधील आवडी, अपेक्षा आणि गरजा वेगवेगळ्या आहेत. खाद्यपदार्थ बनवणे, टेकअवे, डिलिव्हिरीची वेळ आणि कार्यक्षमता हे ग्राहकांचे समाधान ठरवण्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. अपलोडफुडीमध्ये आम्ही आमची उपाययोजना रेस्तराँ व्यवस्थापनाचा अत्यंत मौल्यवान स्त्रोत बनवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांना रेस्तराँ जे काही करते ते सर्व चालवणे, व्यवस्थापन करणे आणि मॉनिटर करणे शक्य होईल.”
व्हाइट लेबल ग्राहक केंद्री अॅप, क्लाऊडवर आधारित ऑर्डर व्यवस्थापन यंत्रणा आणि शक्तिशाली वेब आणि अॅप मॉनिटरिंग डॅशबोर्ड यांच्यासोबत ते एक सर्वांगीण ऑटोमॅटिक लॉयल्टी इंजिन तयार करते जे निष्ठावान ग्राहकांना फायदे देते. एचआर यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांच्या मॉनिटरिंगचे व्यवस्थापन करण्याबरोबरच, ते वापरकर्त्यांच्या मागण्यांचाही आणि समाधानाच्या लेव्हलचा अभ्यास करते आणि त्याद्वारे रेस्टॉरंट्सना त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी डेटा व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती देते.