कॉंग्रेसला धक्का; उर्मिला मातोंडकरने दिला सदस्यात्वाचा राजीनामा !

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला. काही महिन्यांपूर्वीच उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांच्या समोर भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे तगडे आव्हान होते. त्या गोपाळ शेट्टी यांना काँटे की टक्कर देतील असे म्हटले जात होते. परंतु निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला होता.