उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम पुन्हा कॉंग्रेसमध्ये सक्रीय होणार !

0

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा जोर वाढला आहे. दरम्यान स्टार प्रचारक म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच सहभागी होतील. तसेच संजय निरुपम यांची समजूत काढण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.

उर्मिला मातोंडकर लोकसभेत कॉंग्रेसच्या उमेदवार होत्या. लोकसभेनंतर त्यांनी कॉंग्रेसला रामराम केले होते. मात्र त्या पुन्हा सक्रीय होणार असून प्रचाराला लागणार आहे. संजय निरुपम यांनी देखील दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त करत आपण फार काळ पक्षात राहू असे मला वाटत नसल्याचे सांगितले होते. मात्र आता दोघांची समजूत घालण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.