न्युयोर्क- २६/११/ २००८ ला मुंबईवर भ्याड असा दहशतवादी हल्ल्या झाला होता. त्यास आज दहा वर्षे पूर्ण झाली आहे. अद्यापही या हल्लातील दोषींवर कारवाई झालेली नाही, हा पीडितांचा अपमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करण्यात आली असून ती ५० लाख डॉलर अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. या हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिकेच्यावतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची देशवासियांकडून प्रत्येक वर्षी आठवण काढली जाते. यावेळीही यानिमित्त मॅरेथॉनसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.