नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. आज ते फ्रांसमधील जी-7 परिषदेला उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दोघांमध्ये काश्मीर विषयावर देखील चर्चा झाली. काश्मीरचा विषय हा भारत आणि पाकमधील अंतर्गत विषय आहे. यात भारताची बाजू भक्कम असून यात त्यांना यश येईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.