ऐतिहासिक भेट; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग यांची भेट

0

सिंगापूर :- जगातील दोन सर्वात मोठ्या शत्रुराष्ट्रांनी आज प्रथमच मैत्रीचा हात पुढे केला. सिंगापूरमधील सँटास बेटावरील कपॅला हॉटेलमध्ये शिखर बैठक सुरू आहे. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली असून उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची ही शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे. हस्तांदोलन करत या नेत्यांनी बैठकीला सुरुवात केली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम हे अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळणार आहेत. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई हे उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळणार आहेत.

अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांमध्ये ७० वर्षांपासून संबंध नाही. मात्र, आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियातील सर्वोच्च नेत्याची भेट घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे. याभेटीमुळे जगभरात किम जोंग व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा शांततेचा पुढाकार मानला जात आहे. यादरम्यान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्यात जगात शांतता प्रस्‍थापित करण्‍याविषयी उभय नेत्‍यांमध्‍ये चर्चा होणार असल्याचेही समजते.

दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील
भेटी दरम्यान ट्रम्प म्हणाले, आमच्या या भेटीमुळे मला खूपच आनंद होत आहे. आमच्यात सकस चर्चा होणार असून आमची ही भेट यशस्वी होईल यात शंक नाही. ही भेट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. त्यामुळे आमच्या या भेटीमुळे दोन्ही देशात चांगले संबंध प्रस्थापित होतील, यात मला शंका वाटत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा ७२ व्या वाढदिवस १४ जून ला साजरा करण्यात येणार असून ते दोन दिवस आधी जगात शांततेचा संदेश देतील.