उत्तर प्रदेशात भीषण अपघात; १४ जण ठार

0

लखनऊ: गुजरात राज्यातील वडोदरा येथील अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच काल गुरुवारी मध्य रात्रीच्या सुमारास उत्तर प्रदेशात भीषण अपघात झाला आहे, यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ६ अल्पवयीन मुलांचा समावेस आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत प्रयागराज- लखनऊ महामार्गावर ट्रक व वर्‍हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात झाला. लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱ्या वर्‍हाडी मंडळीवर काळाने घाला घातल्याने, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. शिवाय,वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचेही निर्देश दिले आहेत.