नवी दिल्ली: ओडीसा राज्याला मोठ्या प्रमाणात फनी या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या वादळामुळे ओडीसामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. दरम्यान ओडीसा राज्याला देशभरातून मदतीचा हात मिळत आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकारने प्रत्येकी १०-१० कोटींचा निधी ओडीसाला दिले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडापड्डी के.पलानीस्वामी यांनी आज ही घोषणा केली आहे.