शाहजहांपूर/लखीमपूर :- उत्तर प्रदेशामधील लखीमपूर हायवेवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात १३ जण ठार झाले आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात दोन वर्षांची चिमुकली वाचली आहे.
लखीमपूर हायवेवर शनिवारी पहाटे 5 वाजता उभ्या असेलल्या एक ट्रकला प्रवासी वाहतूकने मागून धडक दिली. प्रवासी वाहतूक करणारी गाडी शाहजहांपूर येथू सीतापूरला जात होती. या जोरदार धडकेमध्ये गाडीमधील ९ जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर ८ जखमींना शाहजहांपूर जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या साबिर निशा (50) यांच्या म्हणण्यानुसार , ‘हायवेवर एक ट्रक उभा होता. गाडीमधील सर्व प्रवाशी हे साखर झोपेत होते. त्यानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये होते.’ त्यांनी सांगितले, की माझ्यासोबत माझी सून, दोन वर्षांची नात आणि 12 वर्षांचा नातू होता. नात आणि नातू माझ्यासोबत आहेत, मात्र माझी सून दिसत नाही. आम्ही मुझफ्फरनगरहून सीतापूरला माहेरी जात होतो. याअपघातात 2 वर्षांची चिमुकली तिच्या आईमुळे वाचली आहे. अपघात झाला तेव्हा आईने मुलीला आपल्या कुशीत दाबून धरले, त्यामुळे तिला गंभीर जखम झाली नाही. मात्र अपघातात या चिमुकलीचे मातृछत्र हरपले.