दुर्गा विसर्जन मिरवणुकीत एकावर चाकू हल्ला

0

निंभोरा- दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री 9 ते 9:30 दरम्यान आठवडेबाजार चौक परीसरात एकावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्याची घटना घडली. 19 रोजी रात्री दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक चालू असतांना किरकोळ बाचाबाचीवरून संशयीत आरोपी दगडू ज्ञानेश्वर राजपूत (रा.निंभोरा स्टेशन) याने तिलकचंद भवरलाल मिलिंदा (राजस्थानी) या ईसमावर चाकूने वार करून जखमी केले.

दरम्यान त्यास रावेर येथे उपचार केल्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी 108 ची आरोग्य सुविधा लवकर उपलब्ध न झाल्याने संबंधित जखमीस मालवाहू रीक्षात टाकून नेल्याने नागरीकांनी नाराजी व्याक्त केली. या घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीत एकच खळबळ उडाली. या संदर्भात निंभोरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयीत आरोपी दगडू राजपूत यास अटक करण्यात आली. तपास हवालदार अन्वर तडवी करीत आहे.