वी.दा.सावरकर फाळणीस जबाबदार-अय्यर

0

लाहोर: “विनायक दामोदर सावरकर यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती”, असं वादग्रस्त विधान काँग्रेसमधून निलंबित केलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात केले. लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले. इतकंच नाही तर अय्यर यांनी भारतात सुरु असलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या वादानंतरही, पाकिस्तानात जाऊन जिना यांचे कौतुक केले आहे.

सावरकरांनीच हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. द्विराष्ट्र सिद्धांतही त्यांनीच मांडला आणि त्यांचेच समर्थक सध्या भारतात सत्तेत आहेत, असं सांगत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणुकीपूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक निवडणुका तोंडावर असताना, त्यांनी पुन्हा असे वक्तव्य केले आहे.