वै. दिगंबर महाराज दिंडी चे पंढरपूर कडे प्रस्थान, चिनावल येथे स्वागत

सावदा ता रावेर ( प्रतिनिधी ) – सलग ३९ वर्षाची परंपरा असलेल्या खानापूर ता रावेर येथून निघणार्‍या वै दिगंबर महाराज पायी दिडी आज दि ३० मे रोजी दुपारी चिनावल मुक्कामाला पोहचताच येथील गावकरी, स्री पुरुष वारकर्‍यांनी टाळ, मृदंग व हरिनाम गजरात फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत केले

खानापूर येथील विठ्ठल व श्रीराम मंदिरातून हि पारंपारिक वारी ह भ प दुर्गा दास महाराज खिर्डी यांचे नेर्तुत्वा खाली दिंडी रावेर, विवरा मार्गे आपल्या पहिल्या मुक्काम साठी चिनावल येथे आगमन होताच गावातील प्रमुख मार्गावर सडा, सारवण व रोगोळ्या काढत टाळ मृदंग व विठ्ठल नाम घोषात हभप लिलाधर रेवाजी कोल्हे व नवयुवक मित्र मंडळ चिंचवाडा येथे मुक्काम स्थळी आगमन झाले आज चिनावल मुक्कामात रात्री हरिपाठ, किर्तन होवून सकाळी पुढील मुक्काम साठी दिडी चे प्रस्थान होणार आहे

सदर दिंडी त २३ मुक्काम असून दर मुक्काम ला भाविक गण वारकर्‍यांना प्रसाद व निवासा ची व्यवस्था करतात दर मुक्कामाला रात्री हरिपाठ किर्तन होत असते सदर दिंडी पंढरपूर ला पोहचताच आषाढी एकादशी पर्यत वै दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक संस्थेच्या भव्य अशा रावेर यावल वै दिगंबर महाराज मठात मुक्कामी असते येथे हजारो वारकर्‍यांच्या राहण्याची व जेवणाची दानशूर दात्याकडून व्यवस्था असते तर मठात दररोज हरिपाठ व किर्तन होते यात वारकरी भाविक मोठ्या भक्ती भावाने तल्लीन होवून ठिठ्ठल चरणी लिन होतात तर आषाढी एकादशी ला दर्शन घेवून वै दिगंबर महाराज मठातून काल्याचा प्रसाद घेऊन परततात