अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचन संस्कृती वाढीस लागावी , रसिक वाचकांनी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी वाचन प्रवृत्त व्हावे यासाठी वाचन प्रेरणा गौरव पुरस्कार 2023
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचन संस्कृती वाढीस लागावी , रसिक वाचकांनी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी वाचन प्रवृत्त व्हावे यासाठी गेल्या २० वर्षांत १०० हून अधिक सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. यंदाचे वर्षी वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने अखंड वाचन यज्ञ (Reading Marathon) हा अभिनव उपक्रम शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ८ ते १५ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ८ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत कथा , काव्य , लेख , नाटक , एकांकिका इत्यादींचे अभिवाचन , पुस्तक प्रकाशन , पुस्तक परीक्षण , वाचन प्रश्न मंजुषा वाचन विषयक अनेक उपक्रम सादर करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात १००० हून अधिक वाचक आणि ५००० हून अधिक रसिक श्रोते ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रकारे सहभागी होणार आहेत. *अखंड वाचन यज्ञ* हा उपक्रम रसिक वाचकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.
वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचा भाग म्हणून लेखन व वाचन संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र संपादक व पत्रकार यांचा या निमित्याने *सन्मानपत्र , सन्मानचिन्ह व भेटवस्तू* देऊन सन्मान करण्यात येणार आहे. दैनिक, पाक्षिक , मासिक , साप्ताहिक , पोर्टल आणि यु ट्यूब वृत्तपत्र प्रकाशित करणारे संपादक या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. आपल्या वृतापत्राविषयी माहिती आपण खालील नमुन्यानुसार भरून पाठवावी. मान्यवर परीक्षकांनी निवडलेल्या *पंचवीस* संपादक / पत्रकार यांना *अखंड वाचनयज्ञ* उपक्रमात *वाचन प्रेरणा गौरव २०२३* प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. सदर उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य