राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार कार्यक्रम
उरुळी कांचन:पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट एनवायके क्रीडा युवा कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्नित,नीती आयोग,भारत सरकार दिल्ली संलग्नित, आय एस ओ नामांकित संस्थेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. ह्यावेळी अनेक वक्त्यांचे मार्गदर्शन होणार असून भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.ह्या कार्यक्रमात समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच राष्ट्रीय हितासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येईल . राष्ट्रिय एकात्मता परिषदेमध्ये ज्या कार्यकर्त्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी तसेच भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कारासाठी कार्याची माहिती व बायोडाटा संस्थेत पाठवावा. संपर्कासाठी पत्ता समाजसेवक प्रवचनकार हभप
डॉ रविंद्र भोळे अध्यक्ष पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट उरुळीकांचन ता हवेली जी पुणे सेल 9420173442,7507039542