कामांमुळेच वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी – चित्रा वाघ

0

चिंचवड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्रात महिलांविषयक धोरणांची अंमलबजावणी झाली. राष्ट्रवादीमध्ये देखील महिलांना योग्य आणि सन्मानपूर्वक कार्य करण्याची संधी मिळते. खासदार वंदना चव्हाण यांची काम करण्याची पध्दत, अभ्यासूवृत्ती, राज्‍यसभेत उपस्थित केलेले प्रश्न यामुळेच त्‍यांची दुस-यांदा राज्‍यसभेवर खासदार म्‍हणून निवड केली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्‍हा महिला आघाडीच्या वतीने राज्‍यसभेच्या खासदारपदी वंदना चव्हाण यांची दुस-यांदा बिनविरोध निवड त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर अनिता फरांदे व ज्‍येष्ठ नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका सुलक्षणा धर, संगीता ताम्‍हाणे, माजी नगरसेविका शकुंतला भाट, माजी उपमहापौर रेखा गावडे, विश्रांती पाडळे, शहर संघटिका कविता खराडे, कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, फजल शेख, तसेच लता ओव्हाळ, गोरक्ष लोखंडे, युवती आघाडीच्‍या वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत वैशाली काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन शिल्‍पा बिडकर, तर आभार मनीषा गटकळ यांनी मानले. मनीषा भिलारे, गंगाताई धेंडे, वंदना पिंपळे, भक्‍ति टण्णू, पौर्णिमा पालकर, शीला भोंडवे, संगीता आहेर, वर्षा शेडगे, आशा शिंदे, पल्‍लवी पांढरे, रुपाली गायकवाड, सविता धुमाळ, दीपाली देशमुख आदिंनी संयोजनात सहभाग घेतला.