अखेर वनगा यांना सेनेकडून उमेदवारी

0

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत अखेर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पूत्र आहेत. चिंतामण वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबियांनी केला होता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने 3 मे रोजी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेशही केला. पालघर पोटनिवडणुकीसाठी चिंतामण वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली होती. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्वतोपरी मेहनत करुन, त्यांना निवडून आणू, असा विश्वास शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला होता. चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर, अखेर आज त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.