वरणगांव । प्रतिनिधी
आयुध निर्माणी मधील सुरक्षा रक्षक सकाळी आपल्या दुचाकीने कर्तव्यावर जात असतांना वाटेवर असलेल्या नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यु झाला . हि घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वरणगांव फॅक्टरीचे सुरक्षा रक्षक (दरबान ) शुभम बबलू तायडे (वय – २३ ) रा . भुसावळ हे नेहमी प्रमाणे वरणगांव मार्गे फॅक्टरी येथे सकाळी सात वाजेदरम्यान आपल्या कर्तृत्वावर जात होते . मात्र, रविवारी सकाळपर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे या मार्गावरील लवकीच्या नाल्याला पुर आला असल्याचा अंदाज त्यांना आला नाही . यामुळे त्यांनी नाल्यावर असलेल्या लहानशा पुलावरुन आपली दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला . मात्र, नाल्यातील अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहाने त्यांची दुचाकी घसरून ते पाण्यात वाहुन गेल्याची घटना त्यांची पुलालगत पडुन असलेल्या दुचाकी वरून उघडकीस आली . तर या घटनेबाबत माहिती मिळताच सपोनि आशिषकुमार तसेच आयुध निर्माणीचे कर्मचारी महेश पाटील, रविंद्र सपकाळे व सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता अवघ्या काही अंतरावर त्यांचा मृतदेह काटेरी झुडपात अडकलेला आढळून आला . याबाबत आयुध निर्माणीचे कर्मचारी महेश पाटील यांनी वरणगांव पोलीस ठाण्यात घटनेबाबत दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत शुभम तायडे यांचेवर भुसावळ येथील स्मशानभुमीत सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले .