भुसावळ येथे तापी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

भुसावळ प्रतिनिधी दि 25

  येथील तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती व सखी 1 श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था तर्फे उद्या तापी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २५ जून २०२३ म्हणजेच आषाढ शुद्ध सप्तमी या दिवशी तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई येथून थोड्या अंतरावर पुढे मूळ तापी येथे तापी नदीचा जन्म झाला जिच्या तपश्चर्येच्या तपोसाधनेतून तापाचा व पापाचा नाश होतो तसेच मोक्ष प्राप्ती होते अशा सूर्यकन्या तापीमाईचा आषाढ शुक्ल सप्तमीचे औचित्य साधून दिनांक २५ जून रविवार रोजी भुसावळ येथील इंजिन घाट तटावर तापी उत्थान एवम उत्सव सेवा समिती व सखी श्रावणी महिलाबहुद्देशीय संस्थे तर्फे मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहेत. जन्मोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्या भाविकांना पूजेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी कृपया संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.

स्कंद पुराणातील तापी महात्म्यात तापी माईची माहिती लिहिली आहे. ती महानद्यांपेक्षा अनन्य साधारण महत्व विशद करणारी अशी आहे.ब्रम्हांडनायक नारायणाचे ब्रह्मदेव सुपुत्र होत ब्रम्हदेवाचे कश्यप सुपुत्र होत कश्यप व अदिती या दांपत्यापासून ब्रम्हांडात द्वादश सूर्याची उत्पत्ती झाली त्यातील विवास्नान नामक सूर्याची तापी ही सुकन्या असल्याची माहिती विशद करण्यात आली आहे.

विवस्नान सूर्याचा ताप दाह पत्नी संज्ञा हिला सहन न झाल्याने तिने छाया स्वरूप स्वतःची प्रतिकृती निर्माण करून सूर्य देवासोबत राहिले असल्याचे त्यात वर्णन केलेले आहे त्याच छाया स्वरूप संध्याची तापी ही थोरले सुकन्या असून शनि देव हा सूर्यपुत्र तापीचा सख्खा भाऊ आहे . यमदेव व यमुना नदी तथा अश्विनी कुमार देवही तापीचे भाऊ असल्याची आख्यायिका आहे.

देवर्षी नारदांनी नावथा या बुऱ्हाणपूर पासून ३० किलोमीटर लांब असलेल्या पावन स्थळी तापीला प्रसन्न करण्यासाठी तपो साधना केल्याची आख्यायिका आहे., तापी काठी कण्व ऋषींनी, उदलग ऋषींनी उदळी येथील तापी काठी, कपिल मुनींनी कंडारी येथील तापी ताटावर, शृंग ऋषींनी सिंगत येथे तापी ताटावर तपोसाधनेतून मोक्षप्राप्ती केल्याची आख्यायिका विशद करण्यात आलेली आहे. प्रदेशातील निमाळ प्रांतातून महाराष्ट्रातील अजनाड येथे प्रवेश घेतल्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, चोपडा, धुळे, शहादा, नंदुरबार व थेट गुजरात मध्ये सुरत जवळ ७२४ किलोमीटर लांबीच्या अंतरावरून वाहून येत अरबी समुद्रात विलीन होणारी ही महानदी आहे. दरवर्षी ७ हजार २५० दशलक्ष घनमीटर पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग या महानदीतून होत असतो. हिंदू धर्माच्या ग्रंथा व पुरणा नुसार जेवढे महत्त्व गंगा नर्मदा या नद्यांना आहे तेवढेच तापीचेही आहे खानदेशातील शेतीच नाही तर समाज जीवन समृद्ध करणाऱ्या जीवनदायी तापी नदीच्या भुसावळ शहराला लाभलेल्या वरदानाला व उपकरणाला लक्षात घेऊन तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती व सखी श्रावणी बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे तापी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जन्मोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजेचे महा आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे .तरी भुसावळआतील तसेच परिसरातील सर्व तापी प्रेमींना व पर्यावरण प्रेमींनी तापी जन्म उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत रामदासजी वैष्णव व सौ राजश्री उमेश वे जय प्रकाश शुक्ला सोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.