साकळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत महाजन ( तात्या ) यांचे अल्पशा आजारे निधन

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील साकळी येथील रहिवासी काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत पदाधिकारी व शारदा विद्या मंदीर प्रसारकचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व साकळी परिसरासह गावाच्या विकासात योगदान देणारे आणी आपल्या सामाजीक तसेच शैक्षणिक कार्याच्या माध्यमातुन ठसा उमटविणारे प्रगतीशील शेतकरी वसंत रामजी महाजन ( तात्या ) वय७२ वर्ष यांचे दिनांक ४ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले सुना,नातवंडे असा परिवार असुन, त्यांच्या पत्नी विद्या महाजन या देखील माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या असुन,त्यांचे चिरंजीव तुषार महाजन हे मंत्रालयातील शिक्षण विभागात अव्वर सचिव म्हणुन सेवेत कार्यरत आहेत .