वसंत टॉकीज चौकाला क्रांतीसूर्य महाराणा प्रतापांचे नाव

0

भुसावळ- शहरातील वसंत टॉकीज या भागाचे क्रांतीसुर्य महाराणा प्रताप चौक असे नामकरण करण्यात आले त चौकाचा नाम फलक व चबुतरा उभारणी कामाचा शुभारंभ आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते कुदळ मारुन शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, अमोल इंगळे, गिरीष महाजन आदी उपस्थित होते. 9 मे महाराणा प्रताप जयंतीला लोकार्पण सोहळा होणार आहे.

वसंत टॉकीज चौकाला महाराणा प्रताप यांचे नाव देण्यासंदर्भात नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकुर यांनी विशेष पाठपुरावा करीत ठराव मंजूर करून घेतला. नामफलकाच्या शुभारंभप्रसंगी पिंटू ठाकुर यांच्यासह सुरतसिंग पाटील, समधान महाजन, नरविरसिंग रावळ, प्रदीपसिंग पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, अनुपसिंग ठाकुर, सोनीसिंग ठाकुर, गोपीसिंग राजपुत, सागरसिंग पाटील, रणजितसिंग पाटील, राजेंद्रसिंग ठाकुर, संदीप राणा, मंगलसिंग पाटील, श्रीरामसिंग पाटील, राजेंद्रसिंग पाटील, नितीनसिंग पाटील, वसंतसिंग जाधव, श्यामसिंग पाटील, राजुसिंग मेहरे, संजयसिंग राजपुत, प्रवीणसिंग पाटील, आनंदसिंग पाटील, सुधाकरसिंग पाटील, एकनाथसिंग पाटील, चंद्रकांतसिंग बोरसे, रवींद्रसिंग पाटील, अमोलसिंग पाटील, देविदाससिंग भोळे आदी समाजबांधव उपस्थित होते. आभार रणजितसिंग पाटील यांनी मानले.