वीर दी वेडिंग करतोय बक्कल कमाई

0

मुंबई-शशांक घोष यांचा मल्टीस्टार चित्रपट ‘वीर डि वेडिंग’ प्रदर्शित होऊन चार दिवस होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. प्रचंड कमाई हा चित्रपट करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४५ .२५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि सोनम कपूर आहूजा यांची भूमिका महत्त्वाची आहे. लहानपणापासून सोबत राहत असलेल्या चार मैत्रीणींचावर आधारित हा चित्रपट आहे.

बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई हा चित्रपट करणार हे निश्चित मात्र काही आक्षेपार्ह संभाषण व चित्रीकरणामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट कुटुंबासोबत बघण्यासारखा नसल्याची प्रतिक्रिया देखील उमटत आहे.