‘वीरे दि वेडिंग’ च्या यशानंतर सोनम-करीनाचा फूल-टू धमाल

0

मुंबई : ‘वीरे दि वेडिंग’ चित्रपटाच्या यशानंतर करीना आणि सोनम कपूर सध्या लंडनमध्ये धमाल करत आहेत. येथे त्यांच्यासोबत रिया आणि अर्जुन कपूर देखील पोहोचले आहे. अर्जुन येथे ‘नमस्ते इंग्लँड’ चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी पोहोचला. करीना, सोनम आणि अर्जुनने एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तिघंही पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. अर्जुनने काही फोटोज शेअर केले आहे.

 

अर्जुन कपूर नमस्ते इंग्लंडसाठी

१ जूनला रिलीज झाला ‘वीरे दि वेडिंग’ ने ओपनिंग डे ला १०.७५ कोटी बिझनेस केला होता. यानंतर आतापर्यंत या चित्रपटाने ५२ कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. तरुणांना हा चित्रपट पसंत पडत आहे. ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार फ्रेंड्सच्या भोवती फिरते. हे एका रोड ट्रिपवर जातात. या चौघीही बोल्ड आणि शिवी गाळ करताना दिसतात. रिलेशनशिपविषयी या खुलेपणाने बोलताना दिसतात. डायरेक्टर शशांक घोषच्या या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट सोनम कपूरची बहिण रिया, एकता कपूर, शोभा कपूर आणि निखिल अडवाणीने प्रोड्यूस केला आहे.