भुसावळ- रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या दुसर्या दिवशी शहरात वाहनांसाठी पियुसी तपासणी कॅम्प शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ घेण्यात आला. पहिल्याच दिवशी 162 वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरात चित्र-विचित्र नंबरप्लेटचे फॅड वाढल्याने अशा वाहनधारकांविरुद्ध धडक कारवाई मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी देत हेल्मेट वापराबाबत जनजागृती काढण्यासाठी रॅली काढण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.
गुरुवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याहस्ते धूर तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांचे प्रमाण वाढत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्यासोबतच आपल्या वाहनांची धूर तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले.
प्रसंगी सहायक मोटर वाहन निरीक्षक राहुल जाधव, पांडुरंग आव्हाड, संदीप शिंदे, सिद्धीविनायक ग्रुपचे यतीन ढाके यांची उपस्थिती होती, यावेळी रस्त्याने येणार्या-जाणार्या वाहनांची यावेळी धूर तपासणी करण्यात आली. दिवस भरात 162 वाहनांची तपासणी झाल्याचे मधु चौधरी, महेश चौधरी यांनी सांगितले.