ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन

0

पुणे : जेष्ठ्य नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज शुक्रवारी ४ रोजी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हटकर यांनी प्रायोगिक नाटकांसह व्यावसायिक नाटकांचंही दिग्दर्शन केले आहे. राजाचा खेळ, उघडले स्वर्गाचे दार, मोरुची मावशी, कवडी चुंबक यांसह अनेक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. छबिलदास चळवळीसह विजया मेहता यांच्या नाटकांना नेपथ्य आणि प्रकाश योजनाही त्यांनी केली होती.