नवी दिल्ली – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू लवकरच लॅटीन अमेरिकन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुरुवारी याविषयीची माहिती देण्यात आली. या दौऱ्यात ते गौतेमाला, पनामा आणि पेरू अशा ३ देशांना भेट देतील. त्याचा हा दौरा ६ मे ते ११ मे दरम्यान होईल. उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नायडू यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि लॅटीन अमेरिकन देशांच्या संबंधाला एक महत्त्व आहे. त्या पार्श्वभुमीवरच ही भेट होत आहे.
उपराष्ट्रपतींसोबतच्या बैठकांमध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. या देशांशी संबंधांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक हे प्रमुख विषय असतील. या क्षेत्रांमधील द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत असून तो आणखी बराच वाढण्याची क्षमता आहे. उपराष्ट्रपती आपल्या दौऱ्यादरम्यान तीनही देशांमध्ये उच्चस्तरीय बैठकांना उपस्थित राहतील. तसेच राजकीय नेत्यांसह भारतीय लोकांना देखील भेटतील आणि विद्यापीठांना देखील भेटी देतील.