उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे यांचा सेवापूर्तीनिमित्त चोपडा तालुका धनगर समाजातर्फे सत्कार

चोपडा : चोपडा तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गाधी शिक्षण मंडळ संचलित कला , शास्त्र व वाणिज्य महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा बी एस हळपे 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31जुलै 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने व गेली 33 वर्षे कनिष्ठ महाविदयालयात इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापन व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून असंख्य विदयार्थी त्यांनी घडविल्याने चोपडा तालुका धनगर समाजाच्यावतीने मधुकर चिंधू कंखरे ( माजी सरपंच कमळगाव व श्री योगेश्वर शिक्षण मंडळ अहिल्याबाई होळकर माध्य. विद्यालयाचे अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्य प्रा बी एस हळपे व सौ माधुरी हळपे यांचा सत्कार करण्यात आला व गौरवपत्र देऊन गोपाल धनगर , ( सचालक , चोपडा साखर कारखाना )यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ . नरेंद्र शिरसाठ यांनी केले व सूत्रसंचालन भूपेश धनगर व व्ही जे पवार यांनी केले. आभार प्रदर्शन दत्तू गुरुजी यांनी केले . याप्रसंगी तालुक्यातील राजकिय , सामाजिक ,शैक्षणिक ,वैद्यकिय , प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर , गुणवंत विद्यार्थी, पालक, समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.