रायपूर – वाजपेयींच्या अस्थी कलश यात्रा आणि त्यानंतर आयोजित शोकसभेकच्या कार्यक्रमात भाजपचेच दोन मंत्री हास्यविनोद गुंग असल्याचा एक व्हिडियो समोर आला आहे.
https://www.youtube.com/watch?time_continue=4&v=E2ehwJCYmTA
अस्थी कलश यात्रेत व्यासपीठावर बसलेले संसदीय कार्यमंत्री अजय चंद्राकार यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे यांना मोबाईलवर काही क्लिप दाखविल्या. त्यावेळेस चंद्राकार हे टेबलवर हात मारत हास्यविनोद करत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कृषीमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल हेही त्यांच्या हास्यात सामिल झाले. यावेळी व्यासपीठावरील भाजपच्याच एका पदाधिकाऱ्यानी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. वेळी सरोज पांडे हेही मोबाईलमध्ये व्यस्त असताना दिसले.
अटलबिहारी यांच्या शोकसागरात सारा देश बुडाला असताना मंत्र्यांची चुकीची हरकत कॅमेऱ्यात कैद झाली आहे.