video पाहून पोटधरून हसाल; अचानक इंस्टाग्राम बंद झाल्याने युजर्सनी व्यक्त केली अशी नाराजी

0

नवी दिल्ली- सोशल मीडियापैकी सध्या अधिक वापरले जाणारे सोशल नेटवर्किंग साईट असेले इंस्टाग्राम अचानक बंद झाले होते. जवळपास एक तास इंस्टाग्राम बंद होते, त्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. इंस्टाग्राम बंद होताच ट्विटरवर ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. जगभरातील इंस्टाग्रामच्या युजर्सना आपले फोटो किंवा प्रोफाईल पाहता येत नव्हती. याशिवाय इंस्टाग्राम अॅपवर टाइमलाइन रिफ्रेश केल्यानंतर  ‘cannot refresh feed’ असा एरर येत होता. तसेच, वेब व्हर्जन वापरणाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. www.instagram.com  वर गेल्यानंतर असा संदेश येत होता. मात्र, आता इंस्टाग्राम पूर्ववत झालं असून युजर्स त्याचा नेहमीप्रमाणे वापर करत आहेत.

https://twitter.com/baeu_taeful/status/1047393492052451328

2010 मध्ये स्थापना झालेल्या इंस्टाग्रामने 2012 मध्ये फेसबुकने जवळपास 1 अब्ज डॉलरमध्ये इंस्टाग्राम खरेदी केलं. काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामच्या दोन फाउंडर्सनी कंपनी सोडली आहे. तर, एक दिवसापूर्वीच फेसबुकने एडम मोसेरी हे इंस्टाग्रामचे प्रमुख असतील अशी घोषणा केली होती. भारतात जवळपास 7 कोटी लोक इंस्टाग्रामचे एक्टिव्ह युजर्स आहेत. इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी अनेक युजर्सनी ट्विटरवर धाव घेतली आणि तेथे त्यांनी शोक व्यक्त करण्यास सुरूवात केली. युजर्सनी केलेले ट्विट पाहून तुम्हाला हसू देखील येईल.