video…बिग-बीने शेअर केले ‘झुंड’ कवितेवरील पथनाट्य

0

नागपूर : मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहेत ते महानायक सोबत. नागराज दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचे शूटींग नागपूरमध्ये सुरु आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. अमिताभ नेहमीच या चित्रपटाबद्दल आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहित असतात.

मध्य प्रदेशातील नागली छोईया गावातील शाळेच्या मुलांनी झुंड कवितेवर केलेले पथनाट्य अमिताभ यांनी शेअर केले आहे. रचना कपूर या शाळेच्या शिक्षिका आहेत. त्यांनी लिहिलेल्या झुंड कवितेवर या विद्यार्थ्यांनी पथनाट्य केले. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर करीत अमिताभ यांना टॅग केला होता. याची दखल बिग बी यांनी घेतली आहे.