video…शंभरी पार केलेल्या आजीला भेटून अनुपम खेर आनंदित

0

मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चे हिरो अनुपम खेर सध्या काही ना काही कारणाने चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अनुपम खेर यांनी खजुराहोमध्ये एका शंभरी गाठलेल्या आजीबाईची भेट घेतली. या आजीबाईंचे वय १०१ आहे. एका झाडाखाली त्यांचा चहाचा छोटा व्यवसाय आहे. हरबी देवी असे त्यांचे नाव आहे. त्यांना भेटून अनुपम खेर यांना फार आनंद झाला. वयाच्या या टप्प्यावर येऊनही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.