नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे चांगलेच तिळपापड झाले आहे. पाकिस्तानचे नेते दररोज नवनवीन वक्तव्य करत आहेत. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शहीद अफ्रीदीने ही उडी घेतली आहे. अफ्रीदीने भारताविरोधात विधान करणे सुरु केले आहे. दरम्यान यावरून भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू भाजपा खासदार गौतम गंभीर याने अफ्रीदीवर जोरदार निशाणा साधला आहे. काही व्यक्ती नुसती शरीराने मोठी होत असतात, मात्र त्यांची बुद्धी वाढत नाही अशा शब्दात गंभीरने अफ्रीदीचे कान टोचले आहे. एखाद्या देशाकडून क्रिकेट खेळायला मोठे व्हावे लागते, मात्र अफ्रीदी नुसती वयाने मोठा झाला अशी टीका गंभीरने केली आहे.