जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या सरकारचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी शिवाजी पार्कवर पार पडला. यात मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर जळगाव शहरात शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. फटाक्याची आतिषबाजी करत शिवसैनिकांनी जल्लोष केला. जळगावातील शिवतीर्थ मैदानावर शिवसैनिकांनी जल्लोष केला.