VIDEO…ऑस्ट्रेलियात रोहित शर्माकडून मातृभाषा प्रेमाचे प्रदर्शन

0

ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन टी-२० मालिका खेळली जात आहे. एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून दुसरा सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. आज तिसरा आणि अंतिम २०-२० सामना खेळला जाणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचा मातृभाषा प्रेमाचा सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे झाले असे रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीविषयी बोलत आहे. पत्रकाराने मराठीत प्रश्न विचारला त्यावेळी रोहित शर्माने त्याला मराठीत उत्तर दिले. यावरून रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलियात मातृभाषेचा गौरव झाल्याचे चाहते म्हणतात.

आयपीएल संघ मुंबई इंडियनने त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर हा व्हिडीयो व्हायरल करण्यात आला आहे.