VIDEO…कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महिलेने भररस्त्यात चोपले

0

बंगळूर- कर्ज देण्याच्या बदल्यात एका महिलेकडे बँक मॅनेजरने सेक्सची मागणी केली. या प्रकारावरून संतापलेल्या महिलेने या बँक मॅनेजरची दंडुक्याने चांगलीच धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एएनआयने देखील याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कर्नाटकतील दवाणागिरी या ठिकाणी झालेली ही घटना आहे. या घटनेत हा बँक मॅनेजर महिलेला विनवण्या करताना दिसतो आहे. मात्र त्याची कॉलर धरून ही महिला त्याला चोप देताना दिसते आहे. सुरुवातीला एका मोठ्या दंडुक्याने ती त्याला मारताना दिसते आहे. त्यानंतर थोबाडीत ठेवून देताना आणि त्यानंतर चपलेने मारताना दिसते आहे. बँकेच्या मॅनेजरने कर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या मागणीमुळे संतापलेल्या महिलेने तिचा उद्रेक दाखवून दिला आहे.