VIDEO…कार्यकर्त्याने भाजप खासदाराचे पाय धुवून प्यायला पाणी

0

गोड्डा-भाजप नेते आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि एखाद्या घटनेमुळे नेहमीच चर्चेत असतात अशीच एक नवीन घटना समोर आली आहे. झारखंड गोड्डा येथील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा एका कार्यकर्त्यांने चक्क पाय धुवून पाणी प्यायला. यावरून खासदार दुबे सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

काल रविवारी निशिकांत दुबे यांच्या मतदारसंघात एका पूलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी पंकज साह हा भाजपा कार्यकर्ता निशिकांत दुबे यांचे पाय धुवून पाणी प्यायला. खरंतर निशिकांत दुबे यांनी असे करण्यापासून त्या कार्यकर्त्याला रोखणे अपेक्षित होते.

पण निशिकांत दुबे यांनी त्या कार्यकर्त्याला रोखले नाही. उलट त्यांनी तो फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो समोर आल्यापासून निशिकांत दुबे यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे.