VIDEO: ‘कोणती सर्जिकल स्ट्राईक’; कमलनाथ यांच्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईकवर सवाल !

0

भोपाल: भारतीय सैन्यदलाने दहशतवादी तळावर हल्ला करून ते उध्वस्त केले होते. जवानांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकचे देशभरात कौतुक झाले. मात्र विरोधकांनी यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सरकार जवानांच्या कामगिरीचे श्रेय घेत असल्याचे आरोप केले. कॉंग्रेसकडून सातत्याने सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आज पुन्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

इंदिरा गांधी यांचे सरकार असताना ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी सरेंडर केले होते, त्याचे कधीही कॉंग्रेसने भांडवल केले नाही. भाजपवाले ते नाही सांगणार आणि म्हणतात सर्जिकल स्ट्राईक केले सर्जिकल स्ट्राईक केले, कोणती सर्जिकल स्ट्राईक केली? असा सवाल कमल नाथ यांनी उपस्थित केला आहे.