जळगाव : जिल्हा पोलीस दल व इंडीयन रेडक्रॉस सोसायटी यांचे संयुक्त विद्ममाने पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉल येथे कोविड – १९ च्या अनुषंगाने रक्तदान शिबिर झाले. या रक्तदान शिबिरात खुद्द पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह अधिकारी कर्मचारी अशा १२५ जणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके,
सहायक पोलीस अधीक्षक डॉ . निलाभ रोहन, डॉ . प्रसन्नकुमार ,मुकुंद गोसावी, श्रीमती उज्वला वर्मा इंडीयन रेडक्रास सोयायटी जिल्हा शाखा रक्तपेढी जळगाव तसेच पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पाटील (प्रभारी -पोलीस उपअधीक्षक गृह ), पोलीस निरीक्षक श्री.बापु रोहोम,पोलीस निरीक्षक श्री.विनायक लोकरे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस निरीक्षक व्ही डी ससे, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक अकबर पटेल, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक पंकज पवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री.शिरसाठ असे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोहेकॉ.मिलिंद केदार यांनी केले.