मुंबई : बहुचर्चित ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ मधील ‘आझादी है गुनाह तो कबुल है सजा…अब तो होगा वही, जो है मंजूर ए खुदा’ या नव्या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सुरैय्या जान म्हणजेच कॅटरिनाच्या जबरदस्त डान्सची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
विशेष म्हणजे कॅटच्या जबरदस्त डान्ससोबतच अजय अतुलच्या भारदस्त संगीतानं हे गाणं अधिक दमदार झालं आहे. सुनीधी चौहान, श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंगसारख्या गायकांनी या गाण्याला आवाज दिला आहे.