पुणे: दहीहंडीच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच पुण्यातील बुधवारपेठमध्ये स्टेज कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत.
#WATCH Stage at Dahi-Handi celebrations in Pune's Budhwar Peth area collapsed yesterday, no major injuries were reported. #Maharashtra pic.twitter.com/xtUzCWQsX3
— ANI (@ANI) September 4, 2018
गोविंदा पथकाला बक्षीसाची ट्रॉफी आणि रक्कमेचं वाटप सुरू असताना अचानक स्टेज कोसळला. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याचं सांगितलं जात आहे. जमावांवर पोलिसांनी हलका लाठी चार्ज केला. त्यानंतर जमाव पांगली. यामध्ये 14 ते 15 जण जखमी झाले असून जखमींपैकी 4 ते 5 जणांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.