VIDEO: बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘मी वाट्टेल ते करेन’: उद्धव ठाकरे

0

मुंबई: आज दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे. शिवसेनेकडून बाळासाहेबांना व्हिडीओतून आदरांजली वाहण्यात आली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही भाग दिसून येतो. ज्यामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वाट्टेल ते करेन, असे उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल ट्विटरवरून बालासाहेबांना अभिवादन केले आहे. फडणवीस यांनी आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांचा एक व्हिडीओ ट्विट केला असून, बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. हा शिवसेनेसाठी एक टोलाच आहे.

‘जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलेले आहे, त्यासाठी मी माझे आयुष्य वाहून टाकलेले आहे. काय वाट्टल ते मी करीन, दिवस-रात्र मेहनत करीन, आकाश-पातळ एक करील. काय करायचंय ती एकही गोष्ट शिल्लक ठेवणार नाही. पण, मी बाळासाहेबांची एकही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही, ही शपथ आणि वचन मी त्यांना दिले आहे. असे उद्धव ठाकरे या व्हिडीओतील भाषणात म्हणत आहेत. सर्वसामान्य मराठी माणूस, हिंदू आणि दिन-दुबळा हा शिवसेनेकडे आधार म्हणून बघतोय. शिवसेना हा पक्ष निवडणूक लढविण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काढला नाही. अन्यायावरती वार करण्यासाठी हा पक्ष आहे. विधानसभेवर भगवा फडकवल्यावरही ही जाणीव राहणार… अरे बाळासाहेबांनी हे पाहायला पाहिजे होतं, पण ते बघत राहणार आपल्या सर्वांच्या डोळ्यातून बघत राहणार.. आणि ते स्वप्न मी पूर्ण करणारच,” असा आशय उद्धव ठाकरेंच भाषण असलेल्या या व्हिडिओत आहे.