VIDEO: मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण : अभाविप

0

धुळे: धुळे येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीला अभाविपकडून घेराव घालण्यात आला. यावेळी पोलिसांकडून अभाविपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचे आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे.

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनामा घेण्यात यावा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, चालु वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०%कपात करावी, चुकीच्या लागलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करा यांसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्याची मागणी केली होती. मात्र भेट होऊ दिली नसल्याने विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडविला. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून केली असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे.