VIDEO: राफेलचे भारतात ‘हॅप्पी-सेफ’लँड; जंगी स्वागत !

0

अंबाला: भारताची संरक्षण क्षेत्रात ताकत वाढविणाऱ्या बहुप्रतिक्षित राफेल फायटर विमाने आज भारतात दाखल झाल्या आहेत. भारताने फ्रांसकडून ३६ राफेल खरेदी केली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लढाऊ विमान भारताला मिळाली आहेत. या विमानाचे आगमन हरियाणातील अंबाला विमानतळावर आगमन झाले आहे. विमानतळावर पाण्याच्या फवारीने राफेलचे स्वागत करण्यात आले. राफेल येत असल्याने संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले होते.  भारतातील नागरिकांना अभिमान वाटत आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटकडून अंबाला विमानतळावर राफेलचे लँडिंग होत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. फ्रांसहून ७००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून राफेल भारतात दाखल झाल्या आहेत.

फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत. १३५ कोटी जनतेचे याकडे लक्ष लागले होते. राफेलमुळे भारतीय वायुसेनेचे बळ वाढले आहे. भारताच्या विरोधी देशांमध्ये तर राफेलमुळे धडकीच भरली आहे.