अन आंबे घेऊन मनोहर भिडे अवतरले पावसाळी अधिवेशनात!

0
नागपूर:- नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी, पहिल्याच दिवशी सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. नागपूर विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच मनोहर उर्फ संभाजी भिडे सांगलीचे आंबे घेऊन अवतरले. दचकलात ना…! मात्र हे भिडे खरोखरचे भिडे नव्हते तर त्यांच्या प्रतिकृतीमध्ये खुद्द काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये उभे होते. भीमा कोरेगाव दंगलीसाठी जबाबदार असलेल्या मनोहर भिडे यांच्या अटकेसाठी गजभिये यांनी हे अभिनव आंदोलन केले.
यावेळी जनशक्तीशी बोलताना गजभिये म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी सरकार मनोहर भिडेला पाठीशी घालत आहे. या दंगलीस जबाबदार असणाऱ्या भिडेला अटक व्हावी म्हणून हे आंदोलन केले आहे. सरकारला भिडेला अटक करता येत नाही म्हणून मी त्यांच्या वेशभूषेत आलोय, आता मलाच अटक करा असे गजभिये म्हणाले. यावेळी गजभिये यांनी आंब्याची भरलेली टोपली आणून भिडे यांच्या आंबा प्रकरणाचा देखील निषेध केला. आंबे खाल्ल्याने मुलं होतात अशी अतार्किक आणि अवैज्ञानिक विधाने करून भिडे सारखी माणसे समाजाची दिशाभूल करत आहेत. यामुळे अशी अंधश्रद्धा पसरवून समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांना अटक व्हावी अशी मागणी, गजभिये यांनी केली. यावेळी गजभिये यांनी विधानभवनासमोर आलेल्या सदस्यांना आंबे वाटणार असल्याचे सांगितले.