सरकारकडे पुरवण्यामागण्याबाबत आणि कर्जाचा हिशोब मागणार – धनंजय मुंडे

0
नागपूर – आर्थिक नियोजन नाही आणि अवाढव्य पुरवणी मागण्यांचा अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. सरकारने पुन्हा एकदा पुरवणी मागण्या ठेवल्या असून सरकारच्या पुरवण्या मागण्यांवर धनंजय मुंडे यांनी जोरदार टिका केली आहे.
आर्थिक नियोजन ठिक नाही, या सरकारला कोणत्याही गोष्टीचं नियोजन करता येत नाही. संपूर्ण राज्याची घडी विस्कटून गेली आहे. राज्यात यांनी विकासच केला नाही. कोणताही वर्ग या सरकारवर समाधानी नाही. आम्ही या साऱ्याबाबत या सरकार या अधिवेशनात जाब विचारू. जे कर्ज घेतले, पुरवणी मागण्या ठेवल्या त्याचा हिशोब आम्ही मागणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आर्थिक व्यवस्थेचे धिंडवडे काढले- तटकरे
सरकारने राज्याच्या आर्थिक व्यवस्थेते धिंडवडे काढले असल्याची टिका आमदार सुनिल तटकरे यांनी पुरवण्या मागण्यांवर केली आहे. आमच्या सत्तेच्याकाळात १५०० कोटी पुरवण्या मागण्या मांडल्या त्यावेळी हेच आमच्यावर तुटुन पडत होते परंतु हे बजेटच्या ५० टक्के पुरवण्या मागण्या मांडतात. पुढच्या अधिवेशनातसुध्दा मांडतील असा टोला लगावतानाच यांची हेलिकॉप्टरवरील खर्चातही उधळपट्टी सुरु आहे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनांच्या निधीत कपात केली जात असल्याचा आरोपही सुनिल तटकरे यांनी केला.