नवी दिल्ली-भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या भारत सोडून गेला असला तरी लंडनमध्ये ऐटीत आयुष्य जगत आहे. विजय मल्ल्याकडे किती संपत्ती आहे याची अनेकांना उत्सुकता असते. दरम्यान विजय मल्याच्या घरात सोन्याचे शौयचालय असल्याचा धक्कादायक खुलासा लेखक जेम्स क्रॅबट्री यांनी केला आहे.
विजय मल्ल्याच्या लंडनमधील घरी मी चार तास होतो, मोनाको ग्रँड प्रिक्स पहायला न जाता आल्यामुळे त्यावेळी तो उदास होता. इतर लोकांप्रमाणे घरात बसूनच मोनाको ग्रँड प्रिक्स पहावे लागले. त्यावेळी मल्ल्या मद्यपान करत होता. त्यावेळी मला शौचालयला जायचे होते. मला मल्याने रस्ता दाखवला. मी सोन्याचे शौचालय पाहून चकित झाल्याचे क्रॅबट्री म्हणाले. रीम आणि टॉप दोन्ही सोन्याचे असल्याचे जेम्स क्रॅबट्री म्हणाले.
2 मार्च २०१७ला विजय मल्ल्याने भारतातून पलायन केले होते. त्याच्यावर १७ सार्वजनिक बँकांचे१० हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. सध्या मल्या लंडनमध्ये आहे.