नवी दिल्ली-बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या कंपन्यांना १३ हजार ९०० कोटी रुपयांची संपत्ती विकण्याची परवानगी देण्यात यावी २२ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात आपण अशी याचिका दाखल केली आहे अशी माहिती विजय मल्ल्याने दिली. या बँकांनी त्याला थकबाकीदार म्हणून घोषित केले आहे.
… to the sale of assets, it will clearly demonstrate that there is an agenda against me “the Poster Boy” beyond recovery of dues. I continue to make every effort, in good faith to settle with the banks. If politically motivated factors interfere, there is nothing I can do…3/3
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 27, 2018
३१ जुलैला निकाल देण्याची शक्यता
मल्ल्याला फारर आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करा आणि तात्काळ त्याची १२,५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावे यासाठी ईडीने मुंबईतील विशेष कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर तीन दिवसांनी आता विजय मल्ल्याने भारतीय बँकांचे कर्ज फेडण्याची तयारी दार्शवली आहे. मल्ल्याने त्याच्या दिवाळखोरीत गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी १७ भारतीय बँकांकडून ९ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यासंबंधी लंडनमधील न्यायालय ३१ जुलैला निकाल देण्याची शक्यता आहे.
We have requested the Courts permission to allow us to sell these assets under judicial supervision and repay creditors, including the Public Sector Banks such amounts as may be directed and determined by the Court. If the criminal agencies such as ED or CBI object … 2/3
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 27, 2018
मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये ईडीने जप्त केलेली १,६००.४५ कोटींची स्थिर मालमत्ता, ७,६०९ कोटीचे शेअर्स, २१५ कोटीचे फिक्स डिपॉझिट, युनायटेड स्पिरिट लिमिटेडमधील २,८८८.१४ कोटीचे शेअर्स आणि अन्य मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली आहे.
कालच विजय मल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लिहिलेलं आपलं पत्र सार्वजनिक करत आपली बाजू मांडली. विजय मल्ल्याने आपल्याला बँक घोटाळ्याचा पोस्टर बॉय करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना सांगितले आहे की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री दोघांनाही १५ एप्रिल २०१६ रोजी पत्र लिहिले होते. आता सर्व गोष्टी योग्य पद्धतीने मांडण्यासाठी मी ही पत्र सार्वजनिक करत आहे’ आपल्या पत्रावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही, आणि आता आपण ते सार्वजनिक करत आहोत असे मल्ल्याने सांगितले आहे.