लंडन कोर्टाच्या निर्णयाला मल्ल्या देणार आव्हान ! 

0
नवी दिल्ली-भारतीय बँकांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनच्या कोर्टाने दिलेल्या निकालाला आव्हान देणार आहे. १० डिसेंबरला लंडनच्या कोर्टाने त्याला भारतात सोपविण्याचा निर्णय दिला होता. त्याला आव्हान देण्यासाठी मल्ल्याकडे १४ दिवस आहेत. वकिलामार्फेत तो कोर्टात या निर्णयाला आव्हान देणार आहे.
भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यतून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे. मल्ल्याला आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये गेली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली  पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.